डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महापालिकेचे मुख्य कोविड रुग्णालय असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असून २० रुग्णांवरून आता आकडा ४५ रुग्णांवर पोहोचला आहे. दरम्यान, या रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन रावते यांच्यासह काही कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
मागील दोन महिन्यांपासून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे उपलब्ध खाटांपैकी जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा रिक्त झाल्या होत्या. मात्र,मागील आठवड्याभरापासून शहरात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मागील अाठवड्यात रुग्णालयात २० रुग्णांवर उपचार सुरू होते. आता हा आकडा ४५ रुग्णांवर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून आता खाटांची व्यवस्था केली जात आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या