नाशिक शहरात अवैधरित्या गुटखाविक्री करणाऱ्याला अटक

नाशिक (प्रतिनिधी) : इंदिरानगर परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे प्रतिबंधित असल्येल्या गुटखा व तंबाखूची विक्री करण्यासाठी किराणा दुकानामध्ये साठा करून ठेवणाऱ्या संशियित बबलू गुलामनबी शेख  वय २८, रा इंदिरानगर झोपडपट्टी कॅनाल रोड, चंपा नगरी जनता सो. समोर उपनगर यास  काल (दि.३१ मे २०२०) रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचेकडून देण्यात आलेल्या सुचनां नुसार गुन्हेशाखा पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी नाशिक मध्ये अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्या बाबत सूचना दिल्या होत्या, त्यानुसार गुन्हे शाखा, युनिट १ , नाशिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, पो.ना आसिफ तांबोळी, विशाल काठे, दिलीप मोंढे इ. गुन्हे प्रतिबंधित गस्त फिरत असताना, इंदिरा नगर झोपडपट्टी येथील एक इसम प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांची अवैध विक्री करत असल्या ची बातमी गुप्त बातमीदार मार्फत मिळाली.