नाशिक शहरात गुरुवारी (25 जून) सायंकाळी 47 कोरोनाबाधित; दिवसभरात 106 रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. २५ जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने ४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: द्वारका-१, जुने नाशिक-४, पेठ रोड- ८, तारवाला नगर-३, आडगाव-१, मखमलाबाद रोड-२, हनुमानवाडी (पंचवटी)-३, मखमलाबाद चाळ-१, पखाल रोड-१, सारडा सर्कल-१, सातपूर-३, सातपूर कॉलनी-२, पंचवटी-८, गंगापूर-१, हिरावाडी-१, पाटील नगर-१, बागवानपुरा-२, नाशिक (इतर)-१, सिडको-१, रविवार पेठ-१, नाशिकरोड-१ अशा रुग्णांचा समावेश आहे.