नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील भद्रकाली (जुने नाशिक) परिसरात एक जुना वाडा कोसळून त्यात एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दल ताबडतोब पाचारण होऊन बचाव कार्य सुरु झाले. पहाटे चार साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी या घरात चार लोकं उपस्थित होते. या चार जणांपैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
मात्र एका तरुणाचा यात मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहेत. या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरवर्षी पावसाला सुरु झाला कि या भागातील जुन्या वाड्यांची पडझड व्हायला सुरुवात होते. उर्वरित वाड्याचा भाग काढण्याचं काम आता सुरु आहे. कारण कोणत्याही क्षणी हा उर्वरित भाग पडण्याची शक्यता आहे.