नाशिक: सोमवारी (दि 8 जून) अजून 14 पॉझिटिव्ह; दिवसभरात आता 34 रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि 8 जून 2020) रात्री 11 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून 14 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता दिवसभरात 34 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
रात्री उशिरा आढळलेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे:

बागवान पुरा रूम नंबर ३७९९ येथील ४२ व २५ वर्षीय महिला ,५० वर्षीय वृद्ध महिला, ५ वर्षीय बालक कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.२) बदर मंझिल येथील ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.३) सिन्नर फाटा, नाशिकरोड येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.४) सुशील बंगलो, भाभानगर, मुंबई नाका, येथील ४१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

५)कोकणीपूरा, सारडा सर्कल येथील ६८ वर्षीय वृद्ध कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.६)ओम साई पार्क, पिंगळे नगर, पेठरोड येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोरोना बाधित झाले असून त्यात ४१ व ३८ वर्षीय पुरुष व २४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.७) लीला स्मृती बंगला,टी. बी.सँनिटोरियम जवळ,दिंडोरी रोड येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
८)बजरंग नगर आनंदवल्ली येथील ३९ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.