नाशिक (प्रतिनिधी): शहरात आज सकाळी साडे अकरावाजेच्या सुमारास एक जोरदार आवाज झाला आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली. मात्र या आवाजाबाबत सगळ्यांमध्येच संभ्रम होता. सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान शहरासह लगतच्या परिसरात जो आवाज झाला तो एचएएल येथील सुपरसोनिक विमान चाचणी दरम्यान आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ओझर तसेच नाशिक शहरातील अनेक भागात हा आवाज ऐकू आला होता.
एचएएलमध्ये लढाऊ विमानांची निर्मिती होते. त्यामुळे या परिसरात सातत्याने या लढाऊ विमानांची चाचणी सुद्धा होत असते. या चाचणीदरम्यानच हा आवाज ऐकू आला. ह्या आवाजाला हायपरसोनिक असेही म्हंटले जाते.