नाशिक शहरात शुक्रवारी दिवसभरात 10 पॉझिटिव्ह रुग्ण; जाणून घ्या त्यांची हिस्ट्री

नाशिक (प्रतिनिधी): शहरात दिवसभरात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात आडगाव पोलीस हेडक्वार्टर-2, लेखानगर (सिडको)-2, कमोद गल्ली (जुने नाशिक)-2, गणेशवाडी (पंचवटी)-1, रामवाडी पंचवटी-1, महालक्ष्मी थीएटर (पंचवटी)-1, सिन्नर फाटा-1 यांचा समावेश आहे.

यातील काही रुग्णांची हिस्ट्री जाणून घेऊया..

लेखानगर सिडको येथील रहिवाशी ६२ वर्षीय वयोवृद्ध यांना दि.२७ मे २०२० रोजी त्रास होत असल्याने खाजगी  रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले असता त्यांचे नमुने घेण्यात आले ते आज दि २९ मे २०२० रोजी पॉझिटिव्ह आले आहेत.जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

कमोद गल्ली जुने नाशिक येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व गणेश नगर(कर्मा हाईटस) द्वारका परिसरातील ७० वर्षीय व्यक्ती यांचा अहवाल कोरोना बाधीत आलेला आहे.

क्रांतीनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या गणेश वाडी पंचवटी येथील ३४ वर्षीय व्यक्तीला त्रास झाल्याने त्याच्या घश्याचे नमुने घेण्यात आले ते अहवाल पॉझिटिव्ह आले असून खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..

सिताराम कॉलनी गोदा पार्क रामवाडी येथील ३१ वर्षीय रहिवाशी मुंबईहून  कंपनीच्या कामानिमित्त नाशिकला आलेला होता.त्यांचा अहवाल कोरोना बाधीत  आलेला आहे.

महालक्ष्मी थिएटर येथील  रुग्णाच्या संपर्कातील व त्यांच्या कुटुंबातील १६ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

सिन्नर फाटा येथील २६ वर्षीय रहिवाशी हा नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर सिन्नर मध्ये उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा