नाशिक शहरात अजून 8 पॉझिटिव्ह रुग्ण !

नाशिक(प्रतिनिधी): गुरुवारी (दि.21 मे 2020) रात्री 10.40 वाजता प्राप्त झालेल्या अहवालांनुसार नाशिक शहरात तब्बल 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागातील हे रुग्ण आहेत, ही लोकं कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली होती, याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
गुरुवारी (दि.21 मे 2020) रात्री 10.40 वाजता प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये, शिवाजी नगर, वडाळा, पाथर्डी लिंक रोड येथील 63 वर्षीय पुरुष, राठी संकुल, पंचवटी येथील 40 वर्षीय पुरुष आणि 70 वर्षीय पुरुष, नाईकवाडीपुरा येथील 53 वर्षीय महिला, पोलीस हेड क्वार्टर येथील 52 वर्षीय महिला, अंबड लिंक रोड(सातपूर) येथील 45 वर्षीय पुरुष, सातपूर अंबड लिंक रोड येथील 53 वर्षीय महिला आणि मोठा राजवाडा येथील 45 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.