नाशिक शहरात रविवारी अजून दोन पॉझिटिव्ह रुग्ण; दोघंही हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील !

नाशिक(प्रतिनिधी): शहरात रविवारी (दि. २४ मे २०२०) रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण राणा प्रताप चौक (सिडको) येथील आहेत. यात ३१ वर्षीय महिला आणि ६९ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर हे दोन्ही रुग्ण याआधी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील असल्याचे समजते.