कोरोना संक्रामणाचा धाक दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

नाशिक(विशेष प्रतिनिधी): मालेगावला जाऊन आल्याने कोरोना झाला आहे, अंगावर थुंकून संक्रमित करेल असा धाक दाखवत दोन हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा अजब प्रकार द्वारका परिसरात घडला. कोविड-१९ संक्रमण काळात गुन्हेगारीची नवी मोडस् ऑपरेंडी समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता द्वारका चौकातील बेला पेट्रोलपंप येथे ही घटना घडली.

तुफैस अहमद शब्बीर शेख (वय ४५, रा. जोगवाडा, जुने नाशिक) हे पेट्रोलपंपावर काम करत असताना संशयित दीपक सोपान नाडे (वय ३२, रा. नागसेननगर, वडाळा नाका) हा तिथे आला. ‘मी मालेगावला जाऊन आलो आहे. मला कोरोना झाला आहे. तु मला पैसे दे, नाहीतर अंगावर थुंकून तुलाही आजार लावेल’ अशी ध’मकी देत दीपकने दोन हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता दीपक नाडे याने जीवे मा रण्याची धमकी देत शिवी गाळ केली. भद्रकाली पोलिसांनी दीपक नाडे याच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ३८७ (खंडणी), ५०४ (शांतता भंग), ५०६ (धाकदपटशा) अन्वये गुन्हा नोंदविला असून सहायक निरीक्षक सोमनाथ गेंगजे तपास करत आहेत.