नाशिक(विशेष प्रतिनिधी): शहरातील रुग्ण संख्या वाढत असतानाच मनपा नगारसेवकाचा भाऊ करोना पॉझिटीव्ह आढळला आहे. करोना हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरातून या युवकास लागण झाल्याचे बोलले जात आहे. जुने नाशिक परिसरातील नगरसेवकाचा भावाचा मेहबूबनगर परिसरात व्यवसाय आहे. तिथे त्याचे वारंवार येणे-जाणे होते. त्यातच गेल्या आठवड्यापासून या युवकास ताप आदी लक्षणे होती.
मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. काल दुपारी मनपा यंत्रणेने शिंगाडा तलाव परिसरात जाऊन या युवकास उपचारासाठी ताब्यात घेतले व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले. खबरदारीचा उपाय म्हणून या युवकाची पत्नी तसेच मुलालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.