😳 अबब: नाशिक शहरात आढळले डेंग्यू आणि चिकनगुन्याचे इतके रुग्ण

अबब: नाशिक शहरात आढळले डेंग्यू आणि चिकनगुन्याचे इतके रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव तर कमी होतोय मात्र आता डेंग्यू आणि चिकनगुन्या या आजारांनी डोकं वर काढलंय.. गेल्या पंधरा दिवसात नाशिक महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यूचे १७७ तर चिकुनगुन्याचे १७५ रुग्ण असले तरी प्रत्यक्षात रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती पुढे येतेय.. मात्र खासगी रुग्णालये तसेच खासगी लॅबकडून निदान झालेले अहवाल पालिकेपर्यंत पोहोचत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने खासगी लॅबवर डेंग्यू तसेच चिकुनगुन्याने बाधित रुग्णांचे अहवाल पाठविण्याची सक्ती करण्यात आली, त्या पद्धतीने ताबडतोब पावलं उचलणं गरजेचं आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात २०१५ च्या सुमारास डेंग्यूने कळस गाठला होता. त्यावेळीही पालिकेच्या रेकॉर्डवर कमी प्रमाणात रुग्ण आढळत होते. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये आढळणारी रुग्णसंख्या मोठी होती. मात्र त्यानंतर ताक्तालीन आयुक्तांनी वेळीच ठोस उपाययोजना केल्या होत्या.

तसेच गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ आल्यानंतर एकाएकी डेंग्यू व चिकुनगुन्याचे रुग्ण कमी झाले होते. मात्र यंदा पुन्हा एकदा या दोन्ही आजारांनी डोके वर काढले असून कोरोनाची धास्ती कायम असताना आता या कीटकजन्य आजारांमुळे चिंता निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात पावसाने जोर धरला असून त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत.

त्याबरोबरच घरातील फ्रीज, फुलदाणी, रोपांच्या कुंड्यात साचणाऱ्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. सोबत चिकुनगुन्याचे रुग्ण वाढले असून खासगी रुग्णालयांमध्ये या दोन्ही आजारांशी संबंधित लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र पालिकेच्या रेकॉर्डवर दाखवली जाणारी संख्या अल्प आहे. मध्यंतरी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने अंबड व सातपूरच्या  श्रमिकनगरात १८ पथके नियुक्त करून सर्वेक्षण केले.

सातपूर कॉलनी, श्रमिकनगर, कारगिल चौक, नाशिकरोड, पंचवटी, सातपूर भागात ६०४ डेंग्यूचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी १७७ नमुने पॉझिटिव्ह आढळले तर ४०० चिकनगुणियाचे रुग्ण तपासले. त्यापैकी १७५ रुग्णांना चिकनगुणिया झाल्याचे आढळले. सातपूर विभागात एक लाख ४० हजार घरे  तपासली तर सिडकोत ७३ हजार ७२२ नागरिकांचा सर्वेक्षण करण्यात आले.

सातपूरला १०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार:
सातपूर विभागामध्ये डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरिया आदी आजारांच्या रुग्णात वाढ झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार विभागातील रुग्णसंख्या १०० हून अधिक असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत नगरसेवक सलीम शेख यांनी डेंग्यू व चिकुनगुन्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केली? असा प्रश्न विचारला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

चिकुनगुन्याची लक्षणे:
हात-पायांमध्ये तीव्र वेदना, ताप येणे, मळमळ आणि उलटी, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, पुरळ आणि त्वचेचे प्रश्न, अतिसार, निद्रानाश.

या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?