चोरट्यांनी पळवल्या स्पोर्ट्स दुकानातील बंदुकी!

नाशिक (प्रतिनिधी) : नांदुरनाका परीसरातील निसर्ग नगर येथील अथर्व गनहाउस स्पोर्ट्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी एकूण १२१,५००/- रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. यामध्ये २४ एयर पिस्टल, ३ स्टेनगन, ४ एयर रायफल आणि ५ छऱ्यांचे बॉक्स ई. यांचा समावेश आहे.

मंगळवारी (दि.२३) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कशाचीतरी अट लावून दुकानाचे शटर उघडले. आणि दुकानातील वस्तू लंपास केल्या.