नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने साडे पाच लाख रुपयांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी) : जेलरोड येथे राहणाऱ्या जगदीश गांगुर्डे यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी हरिओम अपार्टमेंट, विहितगाव येथील रहिवाशी असलेल्या संदीप वालझाडे यांनी बँकेत कर्मचाऱ्याच्या पदासाठी विविध जागा उपलब्ध आहेत असे सांगत जगदीश गांगुर्डे यांना तुमच्या घरातील एका व्यक्तीला बँकेत कर्मचारी म्हणून नोकरी लाऊन देतो असे सांगितले.

बँकेत नोकरी लागण्यासाठी फी भरावी लागेल असे सांगून संदीप वालझाडे यांनी रोख ३,३०,०००/- रुपये जगदीश यांच्याकडून घेतले. त्यानंतर पुन्हा १ महिन्यानंतर इतर संचालकांना चाहपाण्यासाठी द्यावे लागतील असे सांगत २०,०००/- रुपये संशयित आरोपीने घेतले. परंतु त्यानंतरही नोकरी न लागल्याने जगदीश यांनी आरोपीकडे पैसे मागितले. वारंवार पैसे मागूनही संदीपने पैसे दिले नाही आणि पुढच्या महिन्यात नोकरी लाऊन देतो असे जगदीश यांना सांगितले. आतापर्यंत तब्बल ५ लाख ३० हजार रुपये फसवणूक करून जमा केले. त्यापश्चात जगदीश यांनी सगळे पैसे परत मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर ०३३८/२०२०) भारतीय दंड विधान कलम 420, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.