नाशिकच्या ‘या’ लॅबमध्ये होणार हजार रुपयात कोरोना चाचणी..

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या स्वाब टेस्टिंगसाठी शासनाने निर्धारित केलेला दर हा रुपये २२०० आहे. मात्र आता नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्समध्ये ही चाचणी केवळ १००० रुपयात उपलब्ध करून दिली आहे. हा सवलतीचा दर खालील संकलन केंद्रांवर लागू करण्यात येईल.

आयएमए ऑफिस (शालीमार, नाशिक) आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स, एफ ७, डी लिंक रोड, नाशिक या ठिकाणी हि सुविधा उपलब्ध आहे. या सवलतीच्या आधारे नाशिक शहरातील लाखो नागरिकांना RT PCR गोल्ड स्टॅंडर्ड टेस्ट करणे आवाक्यात आले आहे.