नाशिक शहरात रविवारी 31 मे रोजी आढळून आलेल्या 21 रुग्णांची हिस्ट्री

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी सायंकाळी आढळून आलेल्या २१ रुग्णांची हिस्ट्री जाणून घेऊ या..

वडाळा येथील रुग्णाच्या संपर्कातील ५० वर्षीय पुरुष, ६०,३८,४७,४० वर्षीय महिला,१८,२२ युवती ,९ व १२  वर्षीय बालिका यांचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

दोंदे मळा, पाथर्डी फाटा येथील  मुंबईहून प्रवास करून आलेले  ४८ पुरुष व ३८ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

स्नेहनगर, म्हसरूळ येथील ६५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या व्यक्तीचे दिनांक २९ मे २०२० रोजी निधन झालेले आहे.

कलानगर दिंडोरी रोड येथील रुग्णाच्या संपर्कातील ६७ वर्षीय पुरुषाचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

विनय नगर येथील ३२ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना बाधित आलेला आहे.६) लेखा नगर येथील ३० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

काळे चौक वडाळ नाका येथील ५६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

खोडे नगर वडाळा नाका येथील रहिवाशी ३८वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

झीनत नगर वडाळा गाव येथील ६२ वर्षीय वृद्धाचा अहवाल  कोरोना बाधीत आलेला आहे.

अशोका मार्ग येथील ३९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित आलेला आहे.

गोसावी वाडी येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित आलेला आहे.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..