नाशिक शहरात “या” भागात सापडला अजून एक कोरोनाबाधित रुग्ण..नवीन कन्टेनमेंट झोन !

नाशिक(प्रतिनिधी): आरोग्य सेवकांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड -१९ तपासणी नमुना घेण्यात येतो. त्याप्रमाणे सदर व्यक्ती डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्यांचा तपासणी नमुना दिनांक १० मे २०२० रोजी घेण्यात आलेला होता. सदर व्यक्तीस कुठल्याही प्रकारचा त्रास अथवा लक्षणे नव्हती परंतु त्यांचा तपासणी नमुना कोरोना कोविड-१९ बाधित असल्याचा अहवाल आज दि १२/०५/२०२० रोजी प्राप्त झालेला आहे.

सदर व्यक्ती डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार घेत असून त्यांचे राहते घर त्रिकोणी गार्डन च्या पाठीमागे,काठे गल्ली नाशिक येथे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याचा आदेश आयुक्त, नाशिक मनपा यांनी निर्गमित केलेले आहे.

काठे गल्लीतील प्रतिबंधित क्षेत्र: