नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात लक्षणीय घट दिसून आली आहे. गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार दिवसभरात 103 रुग्ण आढळून आले आहेत. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या शून्य होती. त्याचप्रमाणे सध्या नाशिक शहरात 586 रुग्ण उपचार घेत असल्याचे नाशिक महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे. असे असले तरीही कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे.
नाशिक शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
2 years ago