हृदयद्रावक: नाशिकमधील ३ महिन्याच्या बाळाचा कोरोनाने घेतला बळी !

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून, अनेकांचा या मृत्यू तांडवात बळी गेला आहे. मात्र, नाशिकमध्ये पहिल्यांदाच एका ३ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका हा जेष्ठ नागरिकांना जास्त प्रमाणावर असतो. तसेच ज्या व्यक्तीला आधीपासूनच इतर आजार असतील किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, त्यांच्यामध्ये संसर्गाचा धोका अधिक दिसून येतो. तर, लहान बालकांमध्ये संसर्गाचे प्रमाण हे कमी असून, मृत्यूचे प्रमाण देखील कमी असते. मात्र, नाशिकमधील एका ३ महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, बाळाला आधीपासूनच इतरही काही दुर्धर आजार होते. तसेच या बाळाच्या पोटावर शस्त्रक्रिया केल्याचेही समोर येत आहे. एवढ्या लहान बालकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.