सावधान: नाशिक शहरात कोरोना पाठोपाठ आता या आजारांनी डोकं वर काढलंय…

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्याबरोबरच नाशिक शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने कुठे तरी समाधानाचे वातावरण असतानाच आता, चिकनगुनिया आणि डेंग्यू आजाराने शहरात डोकं वर काढलंय..

त्यामुळे आता कोरोना, म्युकर मायकोसीस ह्या आजारांबरोबरच महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे पुन्हा या आजारांच नवं संकट उभे ठाकले आहे. शहरात चिकनगुनियाचे 31 तर डेंग्यूचे 65 रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीये.. चिकनगुनियाचा अधिक प्रसार हा सातपूर भागात झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेय. त्यामुळे या भागात आरोग्य विभागाकडून फवारणी तसेच तपासणीचे काम सुरू असून आरोग्य विभाग आपलं काम करत असला तरी नागरिकांनी देखील या आजाराबाबत तितक्याच गांभीर्याने काळजी घेण्याची गरज असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आव्हाहन मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांच्या वतीने करण्यात आले आहे..