नाशिक : किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग व दमदाटी

नाशिक (प्रतिनिधी): किराणा दुकानात येऊन महिलेला दमदाटी व तिचा विनयभंग करण्याचा प्रकार चांदशी येथे घडला आहे. निलेश अशोक भालेराव हा इसम चांदशी येथे किराणा दुकानात गेला आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून ४० वर्षीय महिलेला दमदाटी करू लागला. तसेच अश्लील चाळे करून महिलेचा विनयभंगही केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सदर इसमाविरुद्ध गुन्हा (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७२/२०२०) दाखल करण्यात आला आहे.