सिडको परिसरात रविवारी (दि. १५ ऑगस्ट) या ठिकाणी रक्तदान शिबीर

नाशिक (प्रतिनिधी): सिडको येथील धन्वंतरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे रविवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन एक भारत हमारा भारत संघटना व लाईफ लाईन फाउंडेशनचे विशाल कल्पनाबाई साळुंके यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. सामाजिक अंतर पळून हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कॉलेजचे चेअरमन जयंत धुमणे पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी विशाल साळुंके यांच्याशी 9595143978 या क्रमांकावर संपर्क साधावा.