नाशिक शहरात मंगळवारी (दि. 9 जून) दिवसभरात 33 रुग्णांची नोंद !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ९ जून २०२०) प्राप्त झालेल्या अहवालानुसार, दिवसभरात एकूण ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण शहरातल्या वेगवेगळ्या भागातील आहेत. नाशिक शहरातील गर्दी आणि कोरोनाबाधीतांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत असल्याने आता प्रशासनाची चिंतासुद्धा वाढली आहे. आपण जाणून घेऊ या दिवसभरातल्या प्राप्त अहवालातील रूग्णांबाबत सविस्तर माहिती..!

मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता प्राप्त झालेल्या अहवालांत आढळलेल्या रुग्णांमध्ये भाभा नगर -१, कोकणीपुरा -१, साई पार्क (पेठ रोड)-३, दिंडोरी रोड (टीबी सेंटरजवळ)-१, महात्मा नगर-१, बागवानपुरा-१ यांचा समावेश आहे.

मंगळवारी रात्री ८ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळलेल्या रूग्णांमध्ये टाकळी रोड-१, जयदीप नगर-१, सरदार चौक (पंचवटी)-२, नाग चौक (पंचवटी)-२, आनंद छाया (सातपूर कॉलनी)-१, सातपूर कॉलनी-१, टाकळीरोड-१, काठे मळा-२, आझाद चौक-१, पंचवटी-१, फुले नगर-१, नाईकवाडीपुरा-१, कादरी चौक-२, अमरधाम रोड-१ यांचा समावेश आहे.

तर मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळलेल्या रुग्णांमध्ये: आझाद चौक (जुने नाशिक)-१, जयदीप नगर-१, गुंजाळवाडी (जुना देवगाव नाका)-१, सरदार चौक-२, बालाजी सदन (नाग चौक)-१, आनंद छाया (सातपूर कॉलनी)-१ यांचा समावेश आहे.