नाशिक शहरात मंगळवारी (दि. 9 जून) आढळून आलेल्या काही कोरोनाबाधित रुग्णांची हिस्ट्री

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ९ जून २०२०) प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आढळून आलेल्या काही रुग्णांची हिस्ट्री आपण जाणून घेऊया..

पंचकृष्ण बंगला काठे मळा टाकळी रोड येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच कुटुंबातील २४ वर्षीय युवकाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे या दोघांवर  डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत

सुग्रा अपार्टमेंट, ठाणे भिवंडी येथील २६ वर्षीय डॉक्टर महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानी नांदगाव नाशिक असा प्रवास केलेला आहे.त्यांच्यावर समाज कल्याण वसतीगृह येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

जयदीप नगर प्लॉट क्रमांक २३ व २४ येथील २१ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यानी नांदगाव नाशिक असा प्रवास केलेला आहे. त्याच्यावर समाज कल्याण वसतिगृह  येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

भोरे सदन, सरदार चौक पंचवटी येथील  १५ वर्षीय मुलगी व ३८ वर्षीय महिला या मायलेकी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून याच कुटुंबातील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्यावर तपोवन कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

बालाजी सदन,नागचौक, पंचवटी येथील ६० वर्षीय पुरुष व ३६ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे दोघेही  मयत कोरोना बाधित वृद्ध महिलेच्या संपर्कातील आहेत.त्यांच्यावर तपोवन कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहे.

आनंद छाया, सातपूर कॉलनी येथील एकाच कुटुंबातील ४० वर्षीय व्यक्ती व १३ वर्षीय  मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ते जुन्या रुग्णच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंचकृष्ण बंगलो, टाकळी रोड,काठे मळा येथील १ वर्षीय बालक व २८ वर्षीय महिला हे दोघे कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे दोघे एकाच कुटुंबातील आहेत. या दोघांवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आझाद चौक नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला असून जून्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत ९)पंचवटीतील ५६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून जून्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

फुलेनगर,पेठरोड येथील १८ वर्षीय युवकाचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

नाईकवाडी पुरा येथील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

कादरी चौक, नाशिक येथील ४५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तिच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. याच परिसरातील ४५ वर्षीय वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

अमरधाम रोड, कुंभारवाडा येथील २६ वर्षीय महिलेचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.