नाशिक शहरात शुक्रवारी 5 जून अजून 16 रुग्ण; दिवसभरात एकूण 26 कोरोनाबाधित

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ५ जून २०२०) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या आधी शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 10 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे सायंकाळचे १० आणि रात्री उशिराचे १६ असे दिवसभरात एकूण २६ रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकला दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या ही वाढतच आहे.

शुक्रवारी रात्री आढळून आलेल्या रुग्णांमध्ये खोडे नगर-६, कॅनॉल रोड (जेल रोड)-२, राहुलवाडी (पंचवटी)-१, दिंडोरी रोड-१, भद्रकाली-१, अजमेरी मस्जिद(जुने नाशिक)-१, पखाल रोड-१, त्रिमूर्ती नगर(हिरावाडी)-१, विजय नगर (नाईक मार्ग)-१, नाईकवाडीपुरा-१ यांचा समावेश आहे.