नाशिक शहरात बुधवारी रात्री उशिरा 3 जून 18 कोरोनाबाधित रुग्ण

नाशिक(प्रतिनिधी): शहरात बुधवारी (४ जून २०२०) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील ७, समाज कल्याण कोरोना केअर सेंटर-५, तपोवन कोरोना केअर सेंटर- १, बिटको कोरोना केअर सेंटर-१, गजानन चौक(पंचवटी)-१, बिडी कामगार सोसायटी (अमृतधाम)-१, गौतम रेसिडेन्सी (पाथर्डी फाटा)-१, काझी गढी (कुंभारवाडा)-१ यांचा समावेश आहे.