नाशिकमध्ये कोरोनाचा पाचवा बळी; वीसे मळा येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉलेज रोडच्या वीसे मळा येथील एक रहिवासी कोरोनाबाधित आढळून आला होता. हि व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे. हे मालेगावी बंदोबस्ताला होते. मात्र तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला.

यांच्याच कुटुंबातील ३९ वर्षीय महिला, २३ वर्षीय व १७ वर्षीय युवती तसेच १५ वर्षीय मुलाचा अह्वालसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे.