नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि. २५ मे २०२०) रोजी रात्री ८ वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १ आणि सकाळी ११.२० मिनिटांनी प्राप्त झालेल्या अहवालानुसार २ असे एकूण १९ रुग्ण आज दिवसभरात आढळून आले आहेत. हे सर्व शहरातील वेगवेगळ्या भागातील रुग्ण आहेत.
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालानुसार पेठ रोड पंचवटी येथून ४, राम नगर, पेठ रोड येथून ८, शिवाजी वाडी (वडाळा पाथर्डी रोड) येथून २, राहुल वाडी (पेठ रोड) येथून १, वडाळागाव येथून १, आनंद निवास (नाशिक पुणे रोड, आशीर्वाद बस स्टॉप) येथून १ तर राणा प्रताप चौक येथून २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे.