महापालिकेची सेंट्रलाइज्ड बेड रिझर्वेशन सिस्टिम पुन्हा सुरू

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना रूग्णांची संख्या आटोक्याबाहेर गेल्यास कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती सहजासहजी मिळण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुन्हा एकदा सेंट्रलाइज्ड बेड रिझर्वेशन सिस्टिम कार्यान्वित केली असून महापालिकेकडून सोमवारी (दि. १ मार्च) हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाणार आहे. या ठिकाणी कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती रुग्णांना मिळणार असून गरजेनुसार सोयीच्या रुग्णालयात जाता येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू