महापालिकेच्या बिटको रुग्णालयात सुविधांचा अभाव!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात पुरेशी साधने आणि मनुष्यबळ उपलब्ध नाहीत. म्हणून नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात महापालिकेला निवेदन दिले.

बिटको रुग्णालयात किमान ५६ डॉक्टरांची गरज आहे मात्र फक्त १३ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. तसेच १४५ नर्सची गरज असतांना केवळ ६२ नर्स तेथे उपलब्ध आहेत. आणि एकूण ६० वॉर्डबॉय ची गरज असून फक्त २० जणच उपलब्ध आहेत. त्यातसुद्धा येथे नियुक्त केलेले कर्मचारी अनेकदा गैरहजर असतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. म्हणून लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.