BREAKING NEWS: नाशिकला अजून १ तर मालेगावचा १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये कालच एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज दि. १६ एप्रिल २०२० रोजी सातपूर अंबड लिंक रोड येथील ६३ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तसेच मालेगावचा ६४ वर्षीय पुरुष जो अँजिओप्लास्टीसाठी नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल होता त्यालाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे आता शहरातही आकडे वाढत आहेत. दरम्यान काल समाजकल्याणच्या शेल्टर मधला एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तेथील तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांनी आता सजग होणे गरजेचे आहे. आज सकाळपासून नाशिक शहरामध्ये कलम ४ आणि सोशल डिस्टनसिंगची पायमल्ली होताना दिसत आहे..