लॉकअप मध्ये संशयित आरोपीचा आत्मह त्येचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): लॉकअप मध्ये बंद असलेल्या आरोपीने पेपर टाचन ने स्वतच्या पोटावर ओरखडे मारून दुखापत केली. तसेच लॉकअपच्या भिंतीवर डोके आपटून आत्मह त्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी (२ मे २०२०) रोजी अंबड पोलीस ठाणे येथे घडला. या प्रकरणी तक्रारीची  नोंद केली आहे.

आरोपी विजय तुकाराम वाघमारे (वय ४५) रा. कारगिल चौक दत्तनगर सिडको याने वेळोवेळी वाढत असलेल्या पोलीस कस्टडी रिमांडला वैतागून तसेच त्याने केलेल्या चोरीचा पश्र्चाताप होऊन, अंबड पोलीस ठाणे येथे सिव्हील हॉस्पिटल येथून पेपर टाचन तोंडात लपवून आणली.

आणि स्वत:च्या पोटावर ओरखडून दुखापत केली तसेच लॉकअप मधील भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर एकनाथ पठाडे वय ५५, अंबड पोलीस ठाणे यांनी तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक चकोर करत आहेत.