नाशिक: चार संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह- दोन नवीन संशयित दाखल

महाराष्ट्रात दिवसेंदिवस संशयित रुग्णांची संख्या वाढतेच आहे. मात्र नाशिकमध्ये अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. आतापर्यंतच्या चार संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्हआले आहेत ही एक समाधानाची बाब आहे. दुबईला जाऊन परतलेल्या दोन नाशिककरांना मंगळवारी संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मंगळवारनंतर संशयितांचा आकडा वाढून २९ झाला असला तरीही २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. म्हणजेच नाशिकमधील एकही संशयित कोरोनाबाधित आढळलेला नाही.

मात्र तरीही नागरिकांनी स्वतः जबाबदारी ओळखायला हवी. कुणाला सर्दी, ताप किंवा खोकला असल्यास त्वरित डॉक्टरला दाखवावे आणि त्यासोबतच तोंडाला रुमाल किंवा मास्क घालावे, जेणेकरून दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही !