नाशिक(प्रतिनिधी): मालेगावमध्ये आज मंगळवारी एकूण 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून नाशिक शहरातही एक रुग्ण आढळून आला आहे. नाशिक शहरातील रुग्ण हा वडाळा गावातील आहे. त्यामुळे आता हा रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील लोकांना बाहेर किंवा बाहेरील लोकांना आत प्रवेश करता येणार नाही.
