म्यूकरमायकोसिसबाबत नाशिक शहरासाठी महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): दातार कॅन्सर जेनेटिक्स तर्फे आता स्वाब अथवा रक्तनमुन्यावरची पीसीआर तपासणी उपलब्ध केली आहे. या चाचणीमुळे म्यूकरमायकोसिसचे त्वरित आणि खात्रीशीर निदान करणे शक्य झाले आहे. नमुन्यात अत्यंत सूक्ष्म प्रमाणात असले तरी बुरशीचे डीएनए अचूकपणे शोधले जाते.

त्यामुळे ताबडतोब निदान होऊन उपचार सुरु केले जातात. या संवेदनशील पद्धतीने इतर उपलब्ध निदान पद्धतीच्या तुलनेत 3-४ आठवडे आधीच रोगनिदान होऊ शकते असेही दिसून आले आहे. या निदान पद्धतीचा उपचारांच्या दरम्यान मॉनिटरिंग साठीही खूप फायदा होतो. कोविड-१९ आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीं मध्ये काळी बुरशी म्हणजेच म्यूकरमायकोसिसचे प्रमाण सध्या खूप झपाट्याने वाढत आहे.

स्वाब अथवा रक्त  नमुन्यावर म्यूकरमायकोसिसची पीसीआर तपासणी करण्यासाठी दातार कॅन्सर जेनेटिक्स येथे ९६०७९३१३८८ किंवा ९६०७९३१३८७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.