MRI सुरु असतांना २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : मुंबईनाका परिसरात असलेल्या शताब्दी हॉस्पिटलजवळ एम.आर.आय केयर सेंटर येथे एम.आर.आय करण्यासाठी २३ वर्षीय युवकाला दाखल करून घेतले. सदर इसम चांदवड येथे राहणारा असून अतुल पाटील असे त्याचे नाव आहे. गुरुवारी (दि.०१) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्याला दाखल करून घेतले. एम.आर.आय करण्यासाठी त्याला MRI लॅबमध्ये घेऊन गेले. मात्र एम.आर.आय करत असतांना अतुल अचानक बेशुद्ध झाला. त्यानंतर तत्काळ अतुल ला सिव्हील हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मयात घोषित केले.