दुबईहून आलेली लेक आणि तिची आई जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशिक: शहरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या सर्वच कोरोना संशयितांचा अहवाल “निगेटिव्ह” आला असतानाच काल (दि.११ रोजी) दुबईहून आलेली मुलगी आणि तिची आई यांना कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आलंय. त्यांचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.

दुबई येथून परतलेल्या मुलीला आणि तीच्या आईला आज संशयित कोरोना रूग्ण म्हणून नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅप घेण्यात आले असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नाशिकरोड येथील सदर १९ वर्षांची युवती काही दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आली होती. नाशिक महापालिकच्या बिटको रूग्णालयात या युवतीची आई परीचारीका असून तीला त्रास होऊ लागल्याने आज सकाळीच याच रूग्णालयातील डॉक्टरांना दाखवण्यात आले. यावेळी त्या महिलीची मुलगी दुबईहून आल्याचे कळाल्यानंतर महापालिकेने जिल्हा शासकिय रूग्णालयाल कळवले. जिल्हा रूग्णालयाच्या पथकाने बिटको रूग्णालयात येऊन या दोघी मायलेकींना दाखल केले. सदरची युवती दुबईतून आल्याने तीला दाखल करून घेतानाच तीच्या आईवरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघींचे स्वॅप घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी (दि.११) त्याचा अहवाल प्राप्त होईल.दरम्यान, विदेशातून कोणीही नाशिकमध्ये दाखल झाल्यास तातडीने जिल्हा रूग्णालयाला माहिती देऊन त्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

या मायलेकीला कोरोना झाल्याची पुष्टी झाली नसली तरी जिल्हा प्रशासन आता चांगलंच सतर्क झालंय. परदेशातून आलेली ही युवती नाशिकला आल्यानंतर कुणाकुणाला भेटली, तिचे नातेवाईक, मित्र परिवार या सगळ्यांनाच सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. कोरोना संशयितांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जादा दराने मास्क विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे परदेशी पर्यटकांपासूनही दूर राहणे आवश्यक आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये आढळलेल्या संशयित रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. कोरोना व्हायरसबाबत केंद्र व राज्य सरकारमार्फत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळ्जी घेण गरजेचं आहे. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसच वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे.