नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज ३ दिवस बंद

नाशिक(प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसांत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बाजार समिती पुढील ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सभापती संपतराव सकाळे यांनी घेतला आहे. शनिवारी समितीतला एक व्यापारी कोरना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर याच आवारातील एका हॉटेल चालकालासुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. हा संसर्ग अधिक पसरू नये म्हणून शुक्रवार पर्यंत नाशिक ककृषी उत्पन्न बाजार समिती बंद असणार आहे. याचा परिणाम बाजार समितीतल्या व्यवहारावर होऊन कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहे.