मालेगाव: 7 पोलीस, 1 एसआरपीएफ जवान कोरोना पॉझिटीव्ह

मालेगाव(प्रतिनिधी): आज सायंकाळी (29 एप्रिल 2020) 84 पैकी 73 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 11 अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत. सायंकाळी प्राप्त झालेल्या 11 कोरोनाबाधित रूग्णांमध्ये 7 पोलिस तर 1 एसआरपीएफ जवान मिळून 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 205 झाली आहे.

तर 182 ही मालेगावची आतापर्यंतची एकूण संख्या असून, 11 शहर तर 11 जण इतर ग्रामीण भागातील आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.