नाशिक: महंत सुधीरदास पुजारी यांच्याविरोधात गुन्हा

नाशिक (प्रतिनिधी): मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मुलीच्या फोटोवर ‘ही सध्या काय करते’ अशी पोस्ट टाकत समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य केल्याप्रकरणी महंत सुधीरदास पुजारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कारण गायकर यांनी सुधीरदास यांच्या पोस्टमुळे सामाजिक शांतता भंग होईल असे वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.