नाशिकमध्ये सध्या कुठलाही लॉकडाऊन नाही; ‘तो’ व्हिडीओ जुना !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात लॉकडाऊन लागत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. पण असा कुठलाही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. सदर बातमी ही एका खासगी वृत्तवाहिनीवर गेल्या वर्षी दाखविण्यात आली होती. आणि त्याच बातमीचा व्हिडीओ हा सध्या खोडसाळपणाने व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये आणि असे जुने व्हिडीओ व्हायरल करू नये ज्यामुळे संभ्रम निर्माण होईल.