लॉकडाऊन 4.0 कसा आहे.. काय काय सुरु राहणार..

नाशिक(प्रतिनिधी): देशासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाला पळून लावण्यासाठी लॉक डाऊनच्या ३ टप्प्यांनंतर आता चौथा टप्पा जाहीर केला आहे. दरम्यान राज्यात रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान संचारबंदी कायम राहणार आहे. या लॉक डाऊन मध्ये राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये ग्रीन, ऑरेंज, रेड आणि कन्टेनमेंट झोन मध्ये काही प्रमाणात सुत देण्यात आली आहे. राज्याची रेड झोन आणि नॉन-रेड झोन अशी विभागणी करण्यात आली आहे.

रेड झोनमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती यांचा समावेश आहे. उरलेले क्षेत्र नॉन-रेड झोनमध्ये आहेत. कन्टेनमेंट झोनमध्ये लॉक डाऊन ची कठोर अंमलबजावणी .

अशी आहे राज्य सरकारची नवी नियमावली.

 • सर्व झोनमध्ये वय वर्षे ६५ वरील नागरिकांना, तसेच दहा वर्षांखालील मुलांना आणि गर्भवती महिलांना अत्यावाश्यक सेवा वगळता घराबाहेर पडता येणार नाही.
 • बस, रेल्वे, विमानसेवा, शाळा, कॉलेज, हॉटेल्स, मॉल, आस्थापने हे सर्व झोन मध्ये बंदच राहतील.

रेड झोन मध्ये काय सुरु राहणार ?

 • अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानांना परवानगी.
 • चारचाकी मध्ये फक्त २ आणि दुचाकीवर एकालाच परवानगी.
 • मद्याविक्रेत्यांना घरपोच सेवांसाठी परवानगी.
 • एकल दुकानांना परवानगी.
 • सरकारी कार्यालयांत ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी.
 • इ-कॉमर्स अत्यावश्यक सेवांना परवानगी.
 • हॉटेलमध्ये होम डेलिव्हरी ला परवानगी.
 • बँका, पोस्ट, कुरियर सर्विसेस ला परवानगी.
 • आरटीओ कार्यालय सुरु ठेवण्याची परवानगी.