नाशिकहून मजूर गेले आपल्या गावी; विशेष ट्रेनने रवाना !

नाशिक (प्रतिनिधी): आज नाशिक जिल्ह्यातील निवारा गृहांमध्ये असलेल्या मुळच्या उत्तर प्रदेशातील ८४७ मजुरांना मुंबईहून आलेल्या विशेष रेल्वेने लखनौकडे रवाना करण्यात आले. साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे. जाताना त्यांना पाण्याचे बॉटल्स जेवण-खाण बिस्किट सर्व काही देऊन रवाना करण्यात आले. रेल्वे सुटल्यावर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी “जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद” असा घोषणा नाद केला..

दरम्यान काल, नाशिक जिल्ह्यातील निवारा गृहांमध्ये असलेल्या मुळच्या मध्यप्रदेशातील ३३२ मजुरांना मुंबईहून आलेल्या विशेष रेल्वेने भोपाळकडे रवाना करण्यात आले होते.

आज ज्यावेळी मजुरांना रेल्वेने आपल्या गावी पाठवण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रवाशांची आपुलकीने विचारपूसही केली.

त्यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद उपजिल्हाधिकारी (निवारा सेंटर व्यवस्थापन ) नितीनकुमार मुंडावरे आदी उपस्थित होते.