घराचा दरवाजा उघडा असल्याने संधी साधत, चोराने लॅपटॉप केला लंपास !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी परिसरातील एका फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने चोराने प्रवेश करून, ५० हजार किंमतीचा लॅपटॉप चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनमोल पांडुरंग शिंदे (वय २४) हे पंचवटी परिसरामधील अमृतधाम भागातील एसएसडी नगर बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या श्री प्लाझा संजिवनी किराणा दुकानाच्या वरती फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहतात. सोमवारी (दि.२१ डिसेंबर) रोजी फिर्यादी यांच्या फ्लॅटच्या उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. दरम्यान, ५० हजार किंमतीचा अँसर कंपनीचा लॅपटॉप लाल रंगाच्या बॅगमध्ये ठेवलेला असून, तो चोरून नेला.