उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात यावे : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या कामासंबंधातील मुलभूत बाबींची चर्चा करण्याच्या हेतुने आज जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांचा जाणीवपूर्वक आढावा घेतला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे शाश्वत, परिणामकारक नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील छोट्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

यावेळी  बोलताना मंत्री पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सर्वेक्षण व मान्यतांचा महिन्यातून एकदा आढावा मंत्रालय स्तरावर घेण्यात येतो. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थिक तरतूद करण्याबरोबरच शिल्लक कामांसाठी सामित्व मंजूर करणे तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील वगळण बंधाऱ्यांच्या व लिफ्टच्या कामात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून तातडीने ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचे पाणी नाशिक, नगरसह जायकवाडीपर्यंत मुबलक तसेच सातत्यपूर्ण प्रवाहात राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिथे शक्य आहे तिथे पाणी वळवण्यसाठीच्या शक्यता तपासून त्याप्रमाणे आखणी करण्यात येईल. तसेच लहान व पटकन पूर्ण होणारे प्रकल्प तात्काळ पूर्णत्वासाठी नेले जातील त्यासाठी निधीची तरतूदही केली जाईल. मोठ्या प्रकल्पांसाठी प्रसंगी कर्जही काढण्याचे नियोजन केले जाईल. आमदारांच्या मतदारसंघातील चाऱ्यांची कामे तसेच कॅनॉलच्या देखभाल व दुरूस्तीची कामे त्यांच्यासोबत बसून चर्चेतून अधिकाऱ्यांनी पूर्ण करावेत  त्यासाठी १० टक्के निधीची तरतूदही करण्यात आली असल्याचे सांगून पुढील काही दिवसात दिंडोरी व कळवण मतदार संघातील प्रकल्पांच्या कामासाठी प्रत्यक्ष प्रकल्पांना भेट देणार असल्याचेही जलसंपदा मंत्री पाटील यांनी  यावेळी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates