लॉकडाऊनचा अवधी अजून वाढवला.. नाशिक जिल्हा “रेड झोन” मध्ये !

नाशिक(प्रतिनिधी): देशामध्ये लॉकडाऊनचा अवधी अजून वाढवण्यात आला आहे. नुकतंच एएनआयने याबाबत केंद्र सरकारचा हवाला देऊन हे वृत्त दिलं आहे. 4 मे नंतर अजून दोन आठवडे म्हणजेच 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. मालेगावची कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने, केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्याला रेड झोन मध्ये टाकलं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला लॉकडाऊन मधून कुठली सुट मिळेल असं तूर्तास तरी वाटत नाही.