होमिओपॅथी इम्युनो बूस्टर मोफत वाटण्याची परवानगी मिळावी – डॉ. फारूक मोतीवाला

नाशिक (प्रतिनिधी): मालेगाव येथे वाढणारी रुग्णांची संख्या बघता मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचे ट्रस्टी डॉ. फारूक मोतीवाला यांनी या रुग्णांना होमिओपॅथीचे “इम्युनो बूस्टर” देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन काल (दि. 29 एप्रिल 2020) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नाशिक दौऱ्यावर होते.

आ. देवयानी फरांदे, डॉ भालचंद्र ठाकरे (एक्स प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथ) यांच्या उपस्थितीत डॉ. फारूक मोतीवाला यांनी हे निवेदन दिले. डॉ फारूक मोतीवाला यांच्या मागणीप्रमाणे त्यांना मालेगाव येथील कोरोना रुग्ण, विलगीकरण केलेले रुग्ण तसेच ड्युटीवर कार्यरत पोलीस व कर्मचारी वर्गाला तसेच त्यांच्या परिवाराला होमिओपॅथी “इम्युनो बूस्टर”ची मोफत वाटणी करण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. देश संकटात असतांना कमीत कमी नाशिक आणि मालेगाव येथे ही औषधे मोफत वाटून समाजकार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.