HALची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणारा दीपक शिरसाठ RAW च्या जाळ्यात!

नाशिक (प्रतिनिधी): हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कारखान्यामधील संवेदनशील माहिती पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेला पुरवण्याच्या आरोपावरून दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) कारखान्यातील असिस्टंट सुपरवायझर दर्जाच्या कर्मचार्‍याला जेरबंद केले आहे.

नाशिकमधील संशयित दिपक शिरसाठ (वय ४१ रा. कोणार्कनगर, नाशिक) हा विदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून, भारतीय बनावटीच्या विमानांची व त्यांच्याशी संबंधित संवेदनशील माहिती तसेच ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखान्यातील विमान बनवण्याच्या कारखान्याविषयीची  गोपनीय माहिती महिला विदेशी नागरिकांला पुरवत असल्याचे “रॉ” (रिसर्च अँड अनालिसिस विंग) ला मिळाली होती. त्यांनी हि माहिती दहशतवादविरोधी पथकाला दिली. तेव्हापासून शिरसाठवर एटीएसने पाळत ठेवली आणि आता त्याला अटक केली असून, दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच संशयिताकडून ३ मोबाईल, ५ सिम कार्ड, २ मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत. व फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.

संशयिताचा प्रशासनाशी अनेकदा वाद झाला होता. १४ महिन्यांपासून त्यांचे वेतनही बंद करण्यात आले होते. तर दुसर्‍या बाजूला प्रतिबंधित क्षेत्रात कर्मचारी मोबाईलचा वापर करतातच कसा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एचएएलमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेश नाही, कर्मचाऱ्यांनाही कठोर नियमांचे पालन करावे लागते, कामकाजाच्या ठिकाणी मोबाईल वापराला बंदी आहे. परंतु, हे सगळे दुर्लक्षित राहिल्यामुळे दीपकने याचा फायदा घेत गोपनीय माहिती चोरली. शिरसाठ २००७ पासून एचएएलमध्ये काम करत होता. एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांची ठराविक वेळेनंतर बदली करण्यात येते हा एचएएलचा नियम आहे. त्यानुसार शिरसाठडची देखील वर्कशॉप ००६ विभागात वर्षभरापूर्वी बदली करण्यात आली होती. त्या बदलीवरून शिरसाठने व्यवस्थापकांची वाद घातला. व बदली नाकारून, बदली झालेल्या विभागात हजेरी नोंदवून शिरसाठ रबर आणि प्लॅस्टिक या पूर्वीच्याच विभागात येऊन बसायचा. व म्हणून १४ महिन्यांपासून ‘नो वर्क,नो पे’ नुसार त्याचे वेतन थांबवले होते, म्हणून शिरसाठने या कारणावरून एचएएल विरोधात उच्च न्यायालयात दिल्लीला दाद मागण्याच्या तयारीत होता.

शिवाय, वर्षभरापूर्वी आंदोलनही छेडले होते. दीपकच्या खुलास्यानुसार, हसीना नामक तरुणीने फेसबुकवर मैत्री केली. तिने दीपकला जाळ्यात अडकवले व ब्लॅकमेल करू लागली. म्हणून सर्व गोपनीय माहिती तिला पुरवली असे तो म्हणाला. याप्रकरणी अधिक तपासासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.