चांगली बातमी: गोविंद नगरचा रुग्ण कोरोनामुक्तीच्या दिशेने; लवकरच डिस्चार्ज !

नाशिक (प्रतिनिधी): गोविंद नगरचा कोरोनाच्या रुग्णावर उपचार सुरु झाल्यानंतर पुन्हा टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे आता हा रुग्ण कोरोनामुक्तीच्या दिशेने आहे. हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यास लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी लासलगावचा रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्याला डिस्चार्ज मिळाला होता.. एकीकडे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच ही चांगली बातमी आल्यामुळे जरासा दिलासा मिळाला आहे. असे असले तरीही नागरिकांनी नियमांचे पालन करायचे आहे आणि घरात बसून स्वतःला सुरक्षित ठेवायचे आहे..!