आज मालेगाव मधील तीन रूग्ण झाले कोरोनामुक्त !

मालेगाव (प्रतिनिधी): आज मालेगाव मधील तीन रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे, एकाचवेळी तीन रूग्ण बरे झाल्याने वेळेत आरोग्य विभागाशी संपर्क केला असता रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणा समर्थ आहे, हेच यातून दिसून येतेय. जनतेने आजपर्यंत सर्व प्रशासनाला साथ दिलीय.. आतापर्यंत जवळपास 12 रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.. यापुढेही जनतेने साथ दिल्यास, लवकरच नाशिक जिल्हा आपण कोरोनामुक्त करू असा मला विश्वास वाटतो असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले.